बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था

  • Home
  • बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था
image

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था

कोणतीही संस्था असुदेत ती संस्था एका दिवसात कधीच उभी राहत नसते, त्या संस्थेला उभे करण्यापाठी अनेक लोकांनी मेहनत आणि परिश्रम घेतलेले असतात, प्रत्येक संस्थेच्या पाठी तिचा यशस्वी होण्याचा स्वतःचा असा एक इतिहास असतो आणि असाच इतिहास आपल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेचा देखील आहे…

अनेकदा नवनिर्मितीवर चर्चा, विचारविमर्ष करणे गरजेचे असते,परंतु असे जरी असले तरी काही गोष्टींची नवनिर्मीती किंवा काही गोष्टीचां उगम हा अकस्मितपणे होतो, त्या पैकी आपली संस्थाही दुसऱ्या प्रकारात मोडणारी आहे, कारण बल्लाळेश्वर पतसंस्थेची स्थापना ही प्रवासात चर्चा करत असताना झाली असे म्हणावे लागेल.गावाकडील एका संस्थेच्या कामकाजात भाग घेण्यासाठी गेलेलो असताना परतीच्या प्रवासात आपणही संस्था चालवू शकतो, यावर आमचे सर्वांचे एकमत झाले.

बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था यांचा इतिहास

संस्था चालक हे मूळचे बल्लाळवाडीतील असल्याने बल्लाळवाडीची संस्था म्हणण्यास वाव मिळावा म्हणून ग्रामदैवत बल्लाळेश्वराच्या नावाने संस्थेची सुरुवात करण्यात यावी असा शिक्कामोर्तब करण्यात आला.

साधारणपणे १९९८ मधील ही घटना आहे , या संस्थेच्या स्थापनेसाठी सर्वांनी कंबर कसली. सभासद नोंदणी सुरु झाली. हळूहळू लोकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला, लोकांचा सहभाग बघता आपली ही संस्था फक्त एखाद्या वार्ड पुरती मर्यादित न ठेवावी म्हणून प्रयत्नपूर्वक बृहन्मुंबई कार्यक्षेत्राने संस्थेच्या वाढीसाठी सुरुवाट केली गेली . या कामी सौ. आशाताई बुचके यांची मोलाची मदत झाली हे विसरून चालणार नाही, स्थानिक निवासी श्रीमान.आनंदराव गावडे यांनी मुख्यप्रवर्तक म्हणून काम पाहिले, तर आदरणीय. ज्येष्ठ व्यक्तिमत्व श्री. जयवंतशेठ डोंगरे यांना अध्यक्ष म्हणून सर्वांनी मान्यता दिली.

गावातील कार्यकर्ते यांच्याबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये काम करणारे कर्मचारी, कर्नाक बंदर येथील व्यावसायिक, डोंगरी, घाटकोपर, कांजूरमार्ग, येथील ग्रामस्थ व हितचिंतक यांनी सभासद होऊन संस्थेच्या वाढीत मोलाचा वाटा उचलला.

मेसर्स जीवनलाल लल्लुभाई आणि कंपनी मध्ये काम करणारे अनेकजण यात आघाडीवर होते. बरेचजन संचालक झाले देखील, परंतु काही मर्यादांमुळे सुरेंद्र कदम, विजय डोंगरे, लक्ष्मणशेठ गुंजाळ, काळेसाहेब हे देखील अभिनंदनास पात्र आहेत. रमेश डोंगरे, रामदास तांबे, संतोष डोंगरे, चंद्रकांत नवले, कोल्हाळे परिवार यांचा देखील सिंहाचा वाटा होता.

आज संचालक नसलेले परंतु सुरुवातीच्या काळात श्री. जयेश रोकडिया यांनी स्वत:च्या उमरखाडी येथील छोट्याशा जागेत संस्थेसाठी कार्यालयास परवानगी दिली. नंतर जयवंतशेठ यांनी नूरबाग येथे मोठी जागा घेतल्यानंतर संस्था तेथे स्थलांतरीत झाली.

सुरुवातीच्या काळात ५२९ सभासद व एक कोटीं व्यवसाय करणारी संस्था आज २३००० सभासदांच्या विश्वसांस पात्र ठरली आहे, तर संस्थेची १५० कोटी पारकडे वाटचाल सुरु आहे. दरम्यानच्या काळात संस्थेने १२ शाखा सुरु केल्या आहेत. त्यापैकी ८ शाखा स्वमालकीच्या असून ४ शाखाकार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. परंतु या काळात मात्र संस्थेने सानपाडा येथे मुख्यकार्यालयासाठी प्रशस्त अशी स्वमालकीची जागा घेतली आहे.

आज येथूनच संस्थेचा कारभार चालत आहे,काळाबरोबर बदलयला हवं, हे ओळखून तंत्रज्ञांची कासधरत संस्था संपूर्णपणे संगनिकृतीकरून पुढचे पाऊल म्हणून सी.बी.एस.प्रणालीचा अंगीकार करत सभासदांना कोणत्याही शाखेतून व्यवहार करणे सूलभ झाले Q.R. CODE / RTGS/ NEFT / MOBILE APP यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था म्हणून बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था ही नावारूपास आली आहे.

बल्लाळेश्वर पतपेढीची काही मूल्ये

मिशन

आमच्या ग्राहकांना उच्च दर्जाच्या वित्तीय सेवांची संपूर्ण श्रेणी प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे.

व्हिजन २०२५

१७५ कोटी व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल वर्ष (सन - २०२४-२०२५)

image

श्री. आनंद साबाजी गावडे

अध्यक्ष
image

श्री. भगवान भिवराम शेटे

उपाध्यक्ष
image

श्री. सुरेश साबाजी गावडे

संचालक
image

श्री. बाबुराव चिमाजी डोंगरे

संचालक

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi