ठेवी सुविधा

ठेवी सुविधा

सध्या आपण ज्या काळात वावरत आहोत ज्याला आपण तंत्रज्ञानाचे युग म्हणून देखील ओळखतो,या काळात सध्याच्या घडीला एक समस्या अशी आहे जी की,सर्वांना मोठ्या प्रमाणात सतावते आणि ती म्हणजे महागाई…

महागाईच्या या काळात सर्वांनाच खर्चाचे गणित बसवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, आणि यावर प्रत्येकाला काहींना ना काही उपाय हा हवा असतोच तर या महागाईच्या गणितावर सर्वात रामबाण असा कोणता उपाय असेल तर तो म्हणजे बचत…

बचत हा एकमेव पर्याय असतो ज्याने लोकांना त्यांचे आर्थिक गणित थोडेफार बॅलन्स करायला मदत होते, परंतु असे असले तरी बऱ्याच लोकांकडून बचत होणे शक्य होत नाही कारण बचतीच्या नावावर ठेवलेले पैसे देखील खर्च होऊन जातात, शिवाय फक्त घरातच पैसे बाजूला काढून ठेवले आणि त्याची बचत करायची म्हंटली तरी त्याबद्दल दुसरा असा कोणता फायदा होत नाही. त्यामुळे अनेकांना असे वाटते कि आपली पैश्यांची बचत देखील झाली पाहिजे आणि आपल्याला त्याबदल्यात काही मोबदला देखील मिळाला पाहिजे…

तर बचतीसोबत मोबदला मिळवण्याचा सर्वांत उत्तम पर्याय असतो तो म्हणजे पैश्यांची डिपॉझिट्स म्हणजेच कि ठेवींमध्ये गुंतवणूक करणे..

ठेवी म्हणजे आपले पैसे बँक किंवा बॅंकेत्तर इतर ज्या संस्था असतात त्यामध्ये आपण आपले पैसे विविध प्रकारे गुंतवून ठेवू शकतो ,बँक किंवा त्या संस्था आपल्याला त्या बदल्यात व्याज रूपाने परतावा देतात आणि या प्रकारे बचत करण्यात सुरक्षितता देखील असते…

पैसा येतो आणि निघूनही जातो ते कळतही नाही जमवलेली रक्कम अशीच निघून जाते.त्यामुळे पैसे हे एका सुरक्षित ठिकाणी गुंतवून ठेवायला हवे. आणि ते ठिकाण म्हणजे बल्लाळेश्वर पतसंस्था. पतसंस्थेची मुदत ठेव योजना अशी आहे कि ज्यात रक्कम सुरक्षित राहते व आकर्षक व्याजही मिळते.तुमचा पैसा सुरक्षित ठेवणे आणि मुदत ठेवीवर जास्तीत जास्त परतावा देणे हि आम्ही आमची जबाबदारी समजतो.

तुमच्या अमूल्य अश्या पैश्याला सुरक्षितपणे आणि योग्यप्रकारे गुंतवण्यासाठी आपल्या बल्लाळेश्वर पतसंस्थेमार्फत देखील आम्ही तुम्हाला विविध प्रकारच्या ठेवींचे पर्याय उपलब्ध करून देतो,त्या विविध प्रकारांची यादी येथे जोडण्यात आली आहे ती नक्की तपासून पहा…

Icon

बचत ठेवी  

Learn More
Icon

उत्कर्ष बचत ठेव

Learn More
Icon

मुदत ठेव

Learn More
Icon

दामदुप्पट ठेव

Learn More
Icon

मासिक मुदत ठेव

Learn More
Icon

आवर्त ठेव

Learn More
Icon

लक्षाधीश ठेव

Learn More
Icon

बालविकास ठेव

Learn More

Copyright @ Ballaeshwar Sahakari Patpedhi